येस न्युज मराठी नेटवर्क : राेटरी क्लब ऑफ साेलापूर यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे माजी कुलगुरु व राेटरीचे प्रांतपाल के. भाेगीशयना यांच्या स्मरणार्थ आयाेजित व्याख्यानात या वर्षी साेलापूरचे उद्याेजक यतीन शाह यांचे ‘पाथ टू द टाॅप’ या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान झाले. हे व्याख्यान रविवार दि. 24 जुलै राेजी सायं. कल्पना टाॅकीजजवळील गुजरात भवनच्या वातानुकूलीत सभागृहात संपन्न झाले. प्रारंभी अध्यक्ष राेटे. कालीदास जाजू यांनी स्वागत केले.
माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान यांनी यांनी भोगिषयानासरांच्या आठवणींना उजाळा दिला तर संदीप जव्हेरी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सचिव सुरज तापडिया यांनी आभार प्रदर्शन केले.सूत्रसंचालन संदीप जव्हेरी यांनी केले.
उच्च ध्येय बाळगा, ते पादाक्रांत करण्यासाठी प्रचंड मेहनत करा आणि साध्य करा. झपाटून कार्य करा. कामात आनंद घ्या. अनेक प्रॉब्लेम्स येतील, पण ते ओवरकम करा असे यतीन शाह यांनी आवर्जून सांगितले. आपल्या यशात परिवाराचा पाठबळ आणि कर्मचाऱ्यांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल, राजेंद्र गांधी, सलाम शेख, किशोर चांडक, शिरीष जोशी, संदीप देसाई, जयेश पटेल, सुहास लाहाेटी, शिवाजी उपरे, शिवप्रकाश चव्हाण, लता शिवशंकर, उमा प्रधान, सूर्यनारायण रघोजी आदी उपस्थित हाेते.