कुचन प्रशाला ,कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

0
43

सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीताताई इंदापूरे (सहसचिवा-पद्मशाली शिक्षण संस्था) उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थिती मल्लिकार्जुन सरगम (विश्वस्त- पद्मशाली शिक्षण संस्था) तर निमंत्रित म्हणून माजी उपमुख्याध्यापक बाळासाहेब कोर्टीकर, माजी पर्यवेक्षक संजय मदुरे, माजी तेलुगू शिक्षक प्रभाकर भिमनाथ ,अरुणा गुडूर उपस्थित होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केले. केंद्र सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले. त्याचाच भाग म्हणून अमृतवाटिका 75 देशी वृक्षांचे वृक्षारोपण प्रशालेच्या मैदानात करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात अद्भुत प्रगती झाली. त्यातूनच हरित क्रांती ,धवल क्रांती , औद्योगिकरण , हॉस्पीटल हब अवकाश संशोधन आदी क्षेत्रात प्रगती केली . मात्र आजही दुर्गम भागातील आदिवासींना काही समस्यांना सामोरे जावे लागते असे प्राचार्य मेटे यांनी विचार व्यक्त केले.
यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्राणांची आहुती देणा-या शूरविरांच्या कार्याला सलाम म्हणून मेरा मुल्क, मेरा देश गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले. यामध्ये चांद्रयान 3, नविन शैक्षणिक धोरण, फूड वेस्ट, स्वातंत्र्योत्तर शाळेची प्रतिकृती तर टाकाऊतून टिकाऊ इंडियन क्रॉप्ट केले. प्रशालेच्या दृष्टीने अभिनंदनीय अशा चित्रकला, क्रीडा व इन्स्पायर अवार्ड प्रमाणपत्रांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या लढ्याचे महत्व सांगणारे मनोगत कु. साक्षी व्हटकर (इ.9वी- अ) व श्रध्दा रातुल (इ. 10 वी.ग) या विद्यार्थींनी विचार व्यक्त केले. शालेय उपक्रमाचा भाग म्हणून आज ज्या विद्यार्थ्याचे वाढदिवस आहे त्यांना गुलाब पुष्प देऊन वाढदिवस साजरा करण्यात आले. इ.5वी च्या विद्यार्थ्यांनी देशाची महती सांगणारे फिर भी दिल है हिंदुस्थानी या गीतावर नृत्याविष्कार सादर केला तर तेलुगू विभागातून भारतमातेला वंदन करणारे नृत्य सादर केले. तर ऐ वतन, ऐ वतन या गीतावर इ.9वी 10 वी च्या विद्यार्थिनीनी नृत्य सादर केले. यानंतर सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी आजादी ही मूक नाटिका इ.8 वी 9वी च्या विद्यार्थिनींनी सादर केली. तसेच समाजाला आजादी अर्थ समजावून सांगणारी आजादी के मायने ही नाटिका सादर केली. जयोस्तुते या गीताचे सामूहिक गायन केले. प्रशालेचे इ.8 वी 9वी विद्यार्थ्यांनी याचे गायन केले. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीताताई इंदापूरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. मुलांनो तुम्ही केलेल्या स्वागताने आम्ही भारावलो, आर.एस.पी. च्या विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागत केले. देशभक्तीपर गीत, देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य, सुंदर भित्तीपत्रके सादर केलात.

लहान वयात मोठे संकल्प करा व त्या संकल्पावर ठाम राहा. ब्रिजमोहन भारद्वाज यांनी असाच वयाच्या 12व्या वर्षी निराधार संगोपनाचा संकल्प केला. त्यांनी जेव्हा अपना घर ची स्थापना केली तेव्हा त्यांची संख्या फक्त 23 होती. आज अपना घर मध्ये 10000 लोक सेवा घेतात असे संकल्प करुन देशासाठी योगदान द्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मलिक पठाण यांनी केले. या कार्यक्रमास बेत रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीनिवास चिप्पा, उपप्राचार्य अमिल निंबाळकर , उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल , उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले , पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जून जोकारे , प्राध्यापक वृंद, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.