मध्य रेल्वे सोलापुर विभागा द्वारा 77 वा स्वतंत्र दिवस साजरा

0
30

15 ऑगष्ट 2023 रोजी मध्य रेल्वेतील सोलापूर विभागात 77 वा स्वतंत्र दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट ग्राउंड मध्य रेल्वे सोलापूरच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. श्री नीरज कुमार डोहारे विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात रेल्वे सुरक्षा बल, स्काउट एंड गाइड, सिव्हिल डिफेन्सच्या पथकाद्वारे परेडचे प्रदर्शन करण्यात आले. श्री नीरज कुमार डोहारे यांनी मध्य रेल्वेचे, महाप्रबंधक “आजादी का अमृत महोत्सव” स्वतंत्र दिवसाचा संदेशाचे वाचन केले, मध्य रेल सांस्कृतिक अकादमि द्वारा देशभक्ती गीताची प्रदर्शन आणि “सोलापूरचा मार्सल लॉ” स्वतंत्रता चळवळीवर एक नुकड नाटक सादर करण्यात आले. गुणवंत कर्मचारी, विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदक मंडल कार्मिक अधिकारी श्री मच्छिन्द्र गळवे होते.

या कार्यक्रमात सोलापूर अपर मंडल रेल प्रबंधक शैलेंद्र सिंह परिहार, मंडल सुरक्षा आयुक्त प्रशांत संसारे, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी जी. पी. भगत, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एल. के. रणयेवले वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक प्रदिप हिरडे,वरिष्ठ चंद्रभूषण मंडल अभियंता (समन्वय), वरिष्ठ मंडल इलेक्ट्रिक अभियंता अनुभव वाषर्णेय, वरिष्ठ मंडल सिग्नल आणि दूरसंचार अभियंता राहुल कुमार व सर्व विभागाचे अधिकारी, महिला कल्याण संघटनाचे सदस्य, मान्यता प्राप्त युनियन/असोसिएशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.