• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊस उत्पादकांची पै  न पै  देण्यास बांधील- चेअरमन कल्याणराव काळे 

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2020
in इतर घडामोडी
0
ऊस उत्पादकांची पै  न पै  देण्यास बांधील- चेअरमन कल्याणराव काळे 
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर – चंद्रभागानर,भाळवणी – कारखान्यास कर्ज उपलब्ध करुन घेण्यासाठी बँकांकडून विलंब झाला त्यामुळे ऊस उत्पादकांना वेळेत बिले अदा करता आली नाहीत. मात्र ऊस उत्पादकांची पै न पै  देण्यासाठी आपण बांधील असून,ही बांधीलीकी कायम जपणार आहोत असे प्रतिपादन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले.  

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 च्या 21 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विष्णु पोरे,रघुनाथ झांबरे,दामोदर दुपडे, संभाजी नाईकनवरे या जेष्ठ कर्मचारी यांचे शुभहस्ते आणि गव्हाण,मोळी पुजन समारंभ कारखान्याचे जेष्ठ सभासद भगवान बुरांडे,ज्ञानेश्वर शेंबडे,नवनाथ माने,नारायण गायकवाड,महादेव कानगुडे,संजय गाजरे, रमेश नागणे यांच्या हस्ते संपन्न झाला. तत्पुर्वी शेती विभागातील अॅग्री ओव्हरसिअर प्रकाश कृष्णा शिंगटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नागरताई शिंगटे या उभयतांच्या शुभहस्त्े होमहवन आणि जेष्ठ सभासद संजय गाजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.निलावती गाजरे या उभयतांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले त्यानंतर झालेल्या सभेत काळे बोलत होते. ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार परमेश्वर हरिदास लामकाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पुढे बोलताना कल्याणराव काळे म्हणाले अनेक अडचणी व संकटावर मात करुन आज आपण कारखान्याच्या 21 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण मोळी पुजनाचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. या हंगामासाठी कारखान्याकडे झालेल्या ऊस नोंदीचा विचार करता. सहा लाख मे.टन ऊस गाळपाचे तसेच 75 लाख लिटर डिस्टीलरी उत्पादन आणि 4 कोटी युनिट वीज निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही सर्व उद्दीष्टे साध्य करण्यासाठी ट्रक,ट्रॅक्ट्रर, बौलगाडी,डंपींग व हार्वेस्टर ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करुन अॅडव्हान्स वाटप केलेला आहे. तसेच कारखाना को-जन,डिस्टीलरीचे सर्व मशिनरीचे दुरुस्तीचे कामे पुर्ण झाली आहेत.दुष्काळी परिस्थितीमुळे मागील गळीत हंगाम 2019-20  बंद ठेवावा लागल्यामुळे आर्थिक गणित कोलमडून बँकेकडून निधी उपलब्ध करण्यास अडचणी आल्या. तसेच ऊस उत्पादक शेतक ऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले. गळीत हंगाम चालु करण्यासाठी जवळपास सर्वच कारखान्याना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सन 2020 हे वर्ष कोरोना, दुष्काळ परिस्थिती,शिल्लक साखर साठा, त्यामुळे होणारा आधिक व्याजाचा भुर्दंड यामुळे अनेक समस्यांना सर्वांना सामोरे जावे लागले आहे. तथापी खासदार मा.श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब यांच्या सहकार्यामुळे शासनाची हमी मिळुन राज्य बँकेकडून कर्ज उपलब्ध झालेमुळे आपले कारखान्याचा गळीत हंगाम चालु करता आला असल्याचे सांगीतले.कारखान्यास निधी उपलब्ध करण्यासाठी  विलंब झालेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करण्यास विलंब झाला. यापुढे ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवु देणार नाही अशी ग्वाही दिली. आणि चालु गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार,मजुर कारखान्याचे आधिकारी,कर्मचारी यांचे सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जेष्ठ सभासद संजय गाजरे,तोडणी वाहतुक ठेकेदार परमेश्वर लामकाने,जेष्ठ कर्मचारी प्रकाश शिंगटे यांनी मनोगत व्यक्त करुन गळीत हंगाम शुभारंभास शुभेच्छा दिल्या.   

दिपावलीसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप :-
कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद,बिगर सभासद शेतकरी यांना दिपावली सणासाठी सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी 50 किलो साखर 02 नोव्हेंबर पासुन पंढरपूर, कारखाना कार्यस्थळ व भोसेपाटी या तीन ठिकाणी साखर विक्री केंद्रातून करण्यात येणार आहे. साखरेचे कुपन चिटबॉय घरपोच करणार आहेत. संबंधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी स्वत:चे आधार कार्ड  किंवा ओळखपत्र दाखवुन साखर घेण्यात यावी. 

यावेळी यशवंत पतसंस्थेचे चेअरमन नारायणदादा मोरे, व्हा.चेअरमन शहाजी साळूंखे,प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमर,माजी चेअरमन महादेव देठे, श्री विट्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणेश ठिगळे,निशिगंधा बँकेचे व्हा.चेअरमन आर.बी.जाधव,व्यवस्थापक कैलास शिर्के, जनकल्याण हॉस्पिटलचे डॉ.सुधीर शिनगारे,श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, सुरेश देठे जयसिंह देशमुख, मोहन उपासे,श्रीमंत लिंगडे,हणमंत मोरे,दिलीप भानवसे,अनिल नागटिळक,नारायण शिंदे, सुनिल पाटील,डॉ.महारनवर,महादेव सुरवसे,दाऊद शेख,रामचंद्र कौलगे, विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक गोरख जाधव,बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, आण्णा शिंदे,दिनकर कदम, दिनकर चव्हाण,तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे,राजाराम पाटील,युवराज दगडे,योगेश ताड,इब्राहिम मुजावर, अरुण बागल,नागेश फाटे, माजी संचालक शहाजी पासले, भारत गाजरे, राजसिंह माने, पांडूरंग कौलगे, इस्माईल मुलाणी, हणमंत सुरवसे, प्रताप म्हेत्रे, दिपक गवळी, सुभाष यादव, एम.एस.सी बँकेचे अधिकारी एस.जी.गावंडे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.वाय.महिंद सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख व कर्मचारी वर्ग, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, हंगामी कंत्राटदार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी,कार्यकर्ते हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समाधान काळेसर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक दिनकर चव्हाण यांनी मानले.  

Previous Post

सोलापूर । दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

Next Post

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Related Posts

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026