सोलापूर : नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये सोमवारी आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉक्टर श्रीकांत तिडके यांनी योग साधनेचे महत्त्व विशद केले प्रमुख अतिथी योगिनी गुर्जर यांनी योग साधना ही जगाला भारताने दिलेली मोठी देणगी असल्याचे स्पष्ट केले आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी डॉक्टर धारा श्री गोरा चींचुरे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात शाळेचे विद्यार्थी पालक व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. शिबिर यशस्वी करण्यासाठी देवेंद्र निम्बर्गीकर , अजय पारीख व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.










