• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे जागतिक संदर्भ’ या विषयावर सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद !

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे जागतिक संदर्भ’ या विषयावर सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद !
0
SHARES
4
VIEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जागतिक संदर्भ’ या विषयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद !

आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मनः डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक ४ आणि ५ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अरब- अमेरिकन विद्यापीठाचे डॉ. अयमान इसुफ विशेष पाहुणे असणार आहेत. अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कुलगुरु डॉ. प्रकाश आण्णा महानवर, प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मनः डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजीत करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. गौतम कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सामाजिक न्याय, समानता, लोकशाही, अर्थकारण आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार आज केवळ भारत देशापुरते मर्यादित नसून, ते जागतिक स्तरावर मानवमुक्ती आणि प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. याच विचारांना वैश्विक स्तराबर अधिक दृढ करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विदेशातील आणि भारतातील देशातील विविध राज्यांतून ४०० हून अधिक संशोधक, विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. विविध परिषदेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या विविध पैलूंवर १५० संशोधन पेपरचे सादरीकरण आणि गटचर्चा होणार आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि कायदेशीर क्षेत्रातील डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचे विश्लेषण या सत्रांमध्ये होईल. या परिषदेत ४ डिसेंबर रोजी अत्यंत महत्त्वाचे सत्र ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचार’ या विषयावर डॉ. विजय खरे मांडणी करणार आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीवादी, मानवी हक आणि मानवी स्वातंत्र्यासाठी विषयक विचार या विषयावर डॉ. सुमित म्हसकर, भदंत धम्मनाग, डॉ. प्रकाश पवार, डॉ. वैशाली प्रधान आदी मांडणी करणार आहेत. दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी आंबेडकरवादी प्रबोधनातून सामाजिक परिवर्तनः शिक्षण आणि आर्थिक न्याय या विषयावर प्रशांत रणदिवे, डॉ. त्रिनाध, डॉ. प्रशांत बनसोडे सविस्तर मांडणी करणार आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता एक चळवळ मूकनायक ते प्रबुद्ध भारत या विषयावर डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. रवींद्र चिंचोलकर विषयाची मांडणी करणार आहेत. दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी डॉ. जयभीम शिंदे यांचा सांस्कृतिक

कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. या समारोपाला माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिका येथील टेक्सास विद्यापीठातील डॉ. स्कॉट स्ट्राऊड मार्गदर्शन कणार आहेत.

यावेळी डॉ. गौतम कांबळे म्हणाले, ही आंतरराष्ट्रीय परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वर्तमानकालीन प्रासंगिकतेवर भर देईल. त्यांच्या विचारांची जागतिक स्तरावर होणारी स्वीकारार्हता आणि त्यांचे बहुआयामी दृष्टिकोन या परिषदेत नव्याने मांडले जातील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वव्यापी विचारांचा अभ्यास करण्याची आणि त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक व राष्ट्रीय विकासाला चालना देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर अभ्यास करणारे संशोधक, विचारवंत, पत्रकार, विद्यार्थी आणि सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे अवाहन डॉ. गौतम कांबळे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर,डॉ. तेजस्विनी कांचळे, प्रा. सागर राठोड, डॉ. अंबादास भास्के, प्रा. विठ्ठल एडके उपस्थित होते..

Previous Post

सोलापूर झेडपीतील सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी विजय..

Next Post

आ. देशमुखांमुळे रोखला दिलीप मानेंचा भाजप प्रवेश, गोरे-कोठेचे ऑपरेशन लोटस जोमात

Related Posts

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
Next Post
आ. देशमुखांमुळे रोखला दिलीप मानेंचा भाजप प्रवेश, गोरे-कोठेचे ऑपरेशन लोटस जोमात

आ. देशमुखांमुळे रोखला दिलीप मानेंचा भाजप प्रवेश, गोरे-कोठेचे ऑपरेशन लोटस जोमात

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026