सोलापूर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुमारे 600 ते 700 कोटी रुपयांची कामे झाली आहेत .या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यामुळे या कामांची गुणवत्ता ढासळली आहे. अनेक कामे गेल्या वर्षभरापासून अर्धवट स्थिती मध्येच ठेवून काम पूर्ण झाल्याचे दाखविले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून केलेल्या लाईटच्या कामांमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून कामे अर्धवट ठेवली आहे . विविध कामांसाठी सुमारे 57 कोटी रुपये कन्सल्टन्सी फी देण्यात आली आहे. रस्ते मनमानी पद्धतीने केले आहेत अनेक रस्त्यावर ड्रेनेजची ओबडधोबड कामे झाली आहेत महापालिका आयुक्त पी शिवशंकर आणि स्मार्ट सिटी चे सीईओ त्र्यंबक डेंगळे पाटील यांच्यातील वादामुळे या स्मार्ट सिटी योजनेची वाट लागली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी मधून करण्यात आलेल्या सर्व कामांची सीआयडी तसेच ईडी मार्फत चौकशी केल्यास पंधरा ते वीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होईल. या स्मार्ट सिटी कंपनी मध्ये ज्या संचालकांनी मूकसंमती दिली त्यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील संस्था लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी याबाबत जनहित याचिका दाखल करून आवाज उठवणे गरजेचे आहे
Top 20 News
TOP 20 | सोलापूर शहरात स्काडा प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १०५ कोटींच्या...
सोलापूर । शहराला पाणीपुरवठा करणार औज बंधारा भरलासोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालक पदी अमोल शिंदेशेतकरी आंदोलन । ६ फेब्रुवारीला संयुक्त किसान...