• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारताचा दुहेरी सुवर्ण इतिहास, नेपाळला हरवून विश्वविजेतेपद

Yes News Marathi by Yes News Marathi
January 19, 2025
in इतर घडामोडी
0
भारताचा दुहेरी सुवर्ण इतिहास, नेपाळला हरवून विश्वविजेतेपद
0
SHARES
0
VIEWS

खो-खो विश्वचषक २०२५

नवी दिल्ली, १९ जानेवारी – इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला.

नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघांनी संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला व भारतीय पुरुष व महिला संघांनी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्णअक्षरात कोरले. भारतीय खो-खो संघांनी एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलाच्या सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला.

    पुरुष अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ५४-३६ असा १८ गुणांनी पराभूत केले.

    भारताच्या पुरुष संघाने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करताना नेपाळला जरा सुध्दा डोकं वर काढायला दिले नाही. पहिल्या टर्न मध्ये भारताने तब्बल चार तुकड्या बाद करून नेपाळला जोरदार धक्का दिला व या आक्रमणाच्या टर्नमध्ये भारताने २६-० असे गुण वसूल केले.

    दुसऱ्या टर्न मध्ये नेपाळच्या आक्रमणात भारताची पहिली तुकडी २.४४ मि. संरक्षण करू शकली तर दुसरी तुकडी १.५९ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील खेळाडूंनी २.०२ मि. वेळ देत बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली त्यामुळे मध्यंतराला २६-१८ असा गुणफलक दिसत होता.

    तिसऱ्या टर्न मध्ये आक्रमण करताना भारताने नेपाळची पहिली तुकडी १.४९ मि. बाद केली तर दुसरी तुकडी १.१० मि. तंबूत परतली. तर तिसरी तुकडी अवघ्या ४५ सेकंदात बाद केली. चौथ्या तुकडीला १.०७ मि. बाद केले. पाचव्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाले. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा गुणफलक ५४-१८ असे गुण दर्शवत होता.

    चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमणाला सुरवात केली व भारताची पहिली तुकडी दोन मिनिटात परतवण्यात नेपाळने यश मिळवले. तर दुसरी तुकडी २.१६ मि. बाद झाली तर तिसरी तुकडी २.01 मि. बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली व भारताने हा सामना ५४-३६ असा १८ गुणांनी जिंकत विश्वचषकाला कवटाळले.

    स्पर्धेचे बक्षीस वितरण केंद्रीय मंत्री मा. ना. किरण रिजजू , सुमित्रा महाजन (माजी लोकसभा अध्यक्षा) व विविध मान्यावरांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी खो खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व महासचिव महेंद्र सिंग त्यागी उपस्थित होते.

    सामन्याचे पुरस्कार:

    • सर्वोत्तम आक्रमक: सुयश गरगटे (भारत)
    • सर्वोत्तम संरक्षक : रोहित बर्मा (नेपाळ)
    • सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू: मेहूल (भारत)

    महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचे पारितोषिक

    सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी २ कोटी २५ लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच थेट क्लास वन अधिकारी म्हणून नोकरी देखील राज्य शासनाच्या वतीने दिली जाणार आहे.

    – चंद्रजीत जाधव, सह सचिव भारतीय खो खो महासंघ.

    हा विजय आमच्या मेहनतीचे प्रतीक

    हा विजय आमच्या मेहनतीचे प्रतीक आहे. संपूर्ण भारतासाठी हा एक सुवर्ण क्षण आहे. आजचा दिवस केवळ माझ्या काराकीर्दीतालाच नाही, तर भारतीय खो-खोच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. हा विजय आमच्या संघाच्या अथक मेहनतीचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा, आणि प्रत्येक भारतीयाच्या पाठिंब्याचा परिणाम आहे.

    Previous Post

    प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग |

    Next Post

    जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन

    Related Posts

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
    इतर घडामोडी

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

    August 26, 2026
    मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
    इतर घडामोडी

    मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

    August 26, 2026
    चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
    इतर घडामोडी

    चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

    August 26, 2026
    MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
    इतर घडामोडी

    MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

    August 26, 2026
    सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
    इतर घडामोडी

    सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

    August 26, 2026
    सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
    इतर घडामोडी

    सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

    August 25, 2026
    Next Post
    जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन

    जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन

    ताज्या बातम्या

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

    August 26, 2026
    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

    August 26, 2026
    मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

    मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

    August 26, 2026

    टॉप ५ बातम्या

    • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

      0 shares
      Share 0 Tweet 0
    पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026