• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलफुल सोलापूर उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 7, 2025
in इतर घडामोडी
0
सोलफुल सोलापूर उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS


कृषी पर्यटन, निवासस्थाने आणि जागतिक पर्यटन सप्ताहाची रूपरेषा
सोलापूर, दि. 7 (जिमाका) :- सोलफुल(Soulful) सोलापूर उपक्रमांतर्गत आयोजित पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.


या कार्यशाळेत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शुक्राचार्य भोसले, पुणे विभागाचे पर्यटन समन्वयक अधिकारी सूर्यकांत भुजबळ, पर्यटन उपसंचालक कुंभार मॅडम, पर्यटन प्रकल्प अधिकारी मयूर नांगरे, सहाय्यक पर्यटन अधिकारी गुणवंत पवार, जिल्हा उपनिबंधक सहाय्यक आबासाहेब गावडे, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती अध्यक्ष लहू अवताडे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वर्खडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी चिंचणी गावाच्या पर्यटन विकासाचा यशस्वी अनुभव सांगत”आई योजना” अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली. त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले. कुडल येथील 800 वर्षांपूर्वीच्या शिलालेखासारख्या ठिकाणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यटन सप्ताहात व्यापाऱ्यांनी सवलतीच्या दरात सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केली.


जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी पर्यटन योजनेच्या माध्यमातून शेततळे, फळबाग, नर्सरीसाठी सहाय्य उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी शाश्वत शेतीच्या संकल्पनेवर भर देत जमिनीची सुपीकता राखण्याच्या गरजेवरही प्रकाश टाकला.
पुणे विभागाचे पर्यटन अधिकारी अभिजीत उघडे यांनी निवासस्थानांच्या विविध प्रकारांची माहिती दिली. त्यात स्थानिक कुटुंबासोबत राहण्याची संकल्पना, वेकेशन होम, पर्यटक व्हिला आणि पर्यटक अपार्टमेंट यांचा समावेश होता. महा बुकिंग प्रणालीवर व्यवसायाची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


कार्यशाळेत उपस्थित उद्योजकांनी जल पर्यटनातील बोटींची मागणी, नर्सरी नोंदणी प्रक्रिया आणि शेती परिसरातील निवासस्थाने उभारण्यासाठी कर्ज योजनांबाबत प्रश्न विचारले. काही निवासस्थाने हायवेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असून, तेथे विदेशी पर्यटकही भेट देत असल्याचे एका घरमालकाने सांगितले.


या कार्यशाळेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन, कृषी आणि महिला उद्योजकता यांना नवी दिशा मिळणार असून, पर्यटन सप्ताहाच्या आयोजनामुळे जिल्ह्याचा सांस्कृतिक आणि आर्थिक विकास अधिक गती घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रारंभी पर्यटन समन्वयक श्री. भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. यात 27 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पर्यटन सप्ताह साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली. या सप्ताहात सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार असून, पर्यटन दिंडीचे आयोजनही करण्यात येणार आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामपंचायतींना आर्थिक लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous Post

सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्यास 18 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Next Post

महूद येथील सुनील कांबळे खून खटला:युवकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
महूद येथील सुनील कांबळे खून खटला:युवकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

महूद येथील सुनील कांबळे खून खटला:युवकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

ताज्या बातम्या

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026