प्रॉपर्टी अन् बँक लोन एक्स्पोचे उद्घाटन

0
33

सोलापूर श्री वस्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि श्री समर्थ व्हीआयपी एन्टरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रॉपर्टी अन् बँक लोन एक्स्पोचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन डॉ. सुरेश कोरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विलास पाटील, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष युवराज चुंबळकर, धोंडाप्पा तोरणगी, राजशेखर दिंडोरे, दगडू सुरवसे, व्यंकटेश , अविनाश चाबुकस्वार , शिवगोंडा बिराजदार संगमेश्वर व्हटे, टिजेएसबी बँकेचे व्यवस्थापक निशांत लिमकर, सिद्धेश्वर बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत म्हेत्रे हे उपस्थित होते.
या एक्स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक माणसाला खुला प्लॉट किंवा रो हाऊस, स्वतःच्या हक्काचे घर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्लॉट पण, पैसा पण. या एक्स्पोमध्ये १० हून अधिक बँका व हाउसिंग फायनान्सचा सहभाग होता . या एक्स्पोची टॅग लाइनच ‘तुमचे स्वप्न, आमचे ध्येय’ ही आहे.