मोहिते-पाटील यांची जाणीव वेळ निघून गेल्यानंतर पवारसाहेब यांना झाली?

0
28

काल आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांची शिवरत्न बंगला अकलूज येथे जाऊन भेट घेतली.दादांच्या तब्येतीची विचारपूस केली परंतु पवार साहेबांच्या चेहर्‍यावरती पश्चाताप जाणवत होता.

राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून मोहिते-पाटील परिवाराला आणि पर्यायाने सोलापूर जिल्ह्यातील विकासाला सातत्यपूर्ण अडकाठी आणण्याचं काम केलं गेलं.
राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना मोहिते पाटील जरी राष्ट्रवादी सोडून गेले तरी आम्ही राष्ट्रवादी पक्ष समर्थपणे चालवु असे वाटत होते.परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिट्टी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा सोलापूर जिल्ह्यातल्या अजित दादा पवार गटाकडे गेली की ज्या गटाकडून मोहिते पाटील परिवाराला सातत्यपूर्ण जाणीवपूर्वक विरोध केला जायचा परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून गेले.

राष्ट्रवादी चा कधीही न ढासळलेला बुरुज ढासळला आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला लगेच सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार होत्या यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीच्या नेत्याने सोलापूर जिल्ह्याची राष्ट्रवादीची सूत्र ज्यांच्या हातामध्ये दिली ती मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्ह्यामध्ये धुरा व्यवस्थित संभाळतील असं वाटत होतं परंतु लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये ही सारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रणांगण सोडून दुसऱ्या पक्षात निघून गेली स्पष्ट सांगायचं झालं तर सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात होते ते वेळोवेळी सुभाष बापूंना भेटत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवर्तन यात्रा सोलापूरमध्ये दाखल झाली तेव्हा याच शिंदे बंधूंनी परिवर्तन यात्रेकडे पाठ फिरवली करमाळा मध्ये बगल परिवाराला पवार साहेबांनी भरभरून दिलं,अगदी दिगंबर मामांना मंत्री केलं परंतु बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल या देखील शिवसेनेमध्ये दाखल झाल्या सोलापूर मधले अनेक नेते मंडळी शिवसेनेमध्ये दाखल झाले. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांवरती निष्ठा ठेवून फक्त आणि फक्त मोहोळ चे माजी आमदार राजनजी पाटील साहेब हेच फक्त राष्ट्रवादीमध्ये उरले ज्या मनोहर भाऊ डोंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनेक वेळा झाले तेही भारतीय जनता पार्टीत गेले म्हणजे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातून मोहिते पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर खऱ्या अर्थाने दुसऱ्या फळीतील नेत्यांना वाटत होते की सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी बलाढ्य बनवू बलाढ्य तर सोडाच परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पद घ्यायला आणि 2019 च्या विधानसभेमध्ये तिकीट घ्यायला कोणी तयार होत नव्हतं हे.

आपण सर्वांनी पाहिलं करमाळ्याचे राष्ट्रवादीचे तिकीट शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर यांना द्यावं लागलं पंढरपूर मध्ये ज्या भारत नाना भालके यांना पवार साहेबांनी एवढी ताकद दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एवढी ताकद दिली ते भगीरथ भालके सुद्धा आज पवार साहेबांना सोडून गेलेत विजय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम थांबवल्यानंतर 2019 ते 2023 या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आपला पक्ष कुठे नेऊन ठेवला आहे हे सर्व विचार विजयसिंह मोहिते पाटीलसाहेब यांना भेटल्यानंतर पवार साहेबांच्या मनामध्ये आले असतील पण या सोलापूर जिल्ह्यातला एक मतदार म्हणून खरोखरच विजय दादा हे सोलापूर जिल्ह्यासाठी आणि सबंध महाराष्ट्रासाठी एक दैवी शक्ती आहेत हेच आमचे दैवत आहे विजय दादांच्या नंतर या सोलापूर जिल्ह्यात तर सोडाच परंतु सबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची काय अवस्था झाली हे सबंध महाराष्ट्र पाहतोय मंग विजय दादां सारख्या माणसाला आणि पर्यायाने मोहिते पाटील परिवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून अंतर्गत कुरघोड्या करून मोहिते पाटील परिवाराचं राजकारण खच्चीकरण करण्याचं काम त्यावेळी पक्षातूनच झालं

आज पवार साहेबांना आठवत असेल की अजित दादा पवार साहेबांना एवढं देऊनही ते म्हणतात माझ्यावरती अन्याय झाला परंतु ज्या रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी केली 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनला त्यात प्रामुख्याने विजय दादा व रणजितसिंह दादा यांचे मोठे योगदान होते.

आज अजित दादा म्हणतात माझ्या वरती अन्याय झाला आहे परंतु आज पवार साहेबांच्या मनामध्ये आला असेल की खरंतर अन्याय रणजित दादांवरती झाला होता कारण ज्या माणसाने चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी केली एक अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्राचा झंजावता फिरले तेव्हा 2009 ला नव्यानं निर्माण झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून सबंध तरुण वर्गातून रणजितसिंह मोहिते पाटील हेच माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार होते परंतु पवार साहेबांना पवार साहेबांच्या लेकीला बारामती मतदारसंघ सोडून रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराने पवार साहेबांना माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन देशामध्ये विक्रमी मताने निवडून आणले आणि पवार साहेब देशाचे कृषिमंत्री बनले त्याच मोहिते पाटील परिवाराला 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर मधून पक्षातल्याच अंतर्गत कुरघोडीळीमुळे पराभवाला सामोरे जावं लागलं आज पवार साहेबांच्या मनामध्ये आलं असेल खरं तर अन्याय तर अजित दादा वर झाला नाही खरं माझ्याकडून अन्याय तर सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमानी व दूरदृष्टी असणाऱ्या रणजित दादांवरती झाला होता.

आज खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या चेहर्‍यावर हे सारेभाव दिसत होते. पण आता वेळ निघून गेली आहे मोहिते पाटील परिवाराने सुसंस्कृत राजकारणाचा व जनसेवेचा वसा जपला आहे.