येस न्युज मराठी नेटवर्क : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात सोलापूरातील लोकप्रिय सामाजिक संस्था लोकराजा फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन मा.खा.संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. लोकराजा फाउंडेशन ही शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार करत शाहू महाराजांनी दिलेल्या “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे म्हणून शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे” या संदेशास अनुसरून संस्थेमार्फत डिजिटल एज्युकेशन दिले जाते.
अत्ता पर्यंत संस्थेमार्फत सोलापूर जिल्ह्य़ातील 11 शाळांना प्रोजेक्टर देऊन डिजिटल करण्यात आले आहे. सोलापूर शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे यांनी निवेदनद्वारे केली खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विनंती. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे,आदर्श कापुरे,सागर लोंढे,सुशांत लोभे,गणेश साळंखे,अनिल जगताप, दिनेश जमादार, अनिल कापुरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास रवी शिंदे,तेजस हुगार, उमेश ढेकणे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण सुतार सर यांनी केले.