सोलापूर : शहराचा २३ जून रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात नव्याने १० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १० आहे. कोरोनामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वाधिक ४ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
उद्या गुरुवारी महापालिकेच्या कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाही.