सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या आठ दिवसात उल्लेखनीय कामगिरी करून खंडणीसाठी पिता पुत्राचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सोलापुरातील शुक्रवार पेठ येथील हरिप्रसाद अपार्टमेंट मध्ये राहणारे नागेश धर्माधिकारी आणि त्यांचा मुलगा समर्थ यांचे घरातून अपहरण केल्याची फिर्याद स्नेहा नागेश धर्माधिकारी यांनी 21 सप्टेंबर रोजी दिली होती.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, प्रवीण चुंगे ,ठाणे अंमलदार कृष्णा बडूरे, दत्ता कोळवले, विनोद भटकर नितीन जाधव, या टीमने फिर्यादी स्नेहा धर्माधिकारी यांना आलेल्या अज्ञात मोबाईल क्रमांकावरून या गुन्ह्याचा तपास लावला आहे. यामध्ये मुळेगाव येथे राहणारे महेश गजेंद्र शिंगाडे, तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील अंकुश बंडगर आणि शंकर माशाळकर या तिघांना हडपसर येथून अटक केली आहे.