प्रजनन चिकित्सा परीक्षेत डॉ. मीनल चिडगुपकर देशात दुसऱ्या..

0
78

सोलापूर – स्त्रीरोग तज्ञांच्या फॉग्सी या देशांतर्गत परिषदेने घेतलेल्या प्रजनन चिकित्सा परीक्षेत डॉ. मीनल चिडगुपकर देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. डॉ. मीनल या अपोलो फर्टिलिटी सोलापूर येथे वरिष्ठ आयव्हीएफ सल्लागार असून वंध्यत्व आणि लॅप्रोस्कोपी तज्ञ आहेत. चिडगुपकर हॉस्पिटल येथे संचालक आहेत. भारतात आणि भारताबाहेर त्यांनी लॅप्रोस्कोपी आणि वंध्यत्व या विषयात अनेक फेलोशिप केले आहेत.