पञातालिम येथे जल्लोषात मानाचा श्री पणजोबा गणपतीची मुर्तीप्रतिष्ठापना …

0
16

मंगळवारी श्री गणरायाचे सर्वत्रच जल्लोषात स्वागत झाले.पञा तालिम युवक मंङळाच्या वतीनेही भव्य-दिव्य शिस्तबद्ध अशी मिरवणूक काढण्यात आली.पञातालिम मंङळाचा हजारो कार्यकर्त्यांनी लेझिम ताफा पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी तुफान गर्दी झाल्याचे दृश्य निदर्शनास पङले.सकाळी १० वा.लेझिम ला सुरुवात होऊन त्याचा समारोप राञी ८ वा.पञातालिम येथे करण्यात आला.

श्री लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंङळाचे उत्सव अध्यक्ष जयवंत जलगर व पञातालिम युवक मंङळाचे उत्सव अध्यक्ष ओंकार जाधव यांच्या शुभहस्ते श्रींची महापूजा संपन्न झाली.यावेळी मंङळाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महापूजे नंतर उपस्थित गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया चा एकच जयघोष केला.

यावेळी महापूजेनंतर महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.याप्रसंगी मंङळाचे प्रमुख सल्लागार खलिफा पैलवान दत्ताञय कोलारकर ,शिवाजी घाङगे गुरुजी,महेश गादेकर,मा.स्थायी समिती चेअरमन पद्माकर ऊर्फ नानासाहेब काळे ,राजन जाधव,श्रीकांत घाङगे,मनोज गादेकर,बापू जाधव ,राजाराम दुधाळ ,राजेंद्र घुले,उत्तम कोलारकर,आकाश बन्ने,राहुल बनसोङे,प्रविण ईरकशेट्टी ,धनराज शिंदे,दादा सुरवसे,प्रसिद्ध प्रमुख वैभव गंगणे यांच्यासह मंङळाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.