शहरस्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत पानगल प्रशालेचे वर्चस्व

0
7

सोलापूर :- जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी, सोलापूर शहर स्तरीय शालेय सेपक टकरा 14 17 व 19 वर्षे वयोगट मुले, मुली स्पर्धेचे उद्घाटन समृद्धी स्पोर्ट्स क्लब चे कार्याध्यक्ष मा. सुरेश भोसले यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण क्रीडा भारतीचे प्रमुख समन्वयक मा. सुरेश कळमणकर व उत्पादन शुल्क अधिकारी शोएब बेगमपुरे यांच्या हस्ते करण्यात आले व या स्पर्धेत पानगल प्रशालेने वर्चस्व राखले आहे. असं स्पर्धेचे संयोजक रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे.याप्रसंगी सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष मा.संजय सावंत,उपाध्यक्ष अंबादास पांढरे, सचिव रामचंद्र दत्तू, समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष अविनाश गोडसे,खजिनदार चंद्रकांत सुरवसे असोसिएशनचे सहसचिव व स्पर्धेचे संयोजक रवींद्र चव्हाण,वीरेश अंगडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत बक्षीस वितरण समारंभात 14,17 व 19 वर्षे वयोगट मुले व मुली विजयी सहा संघांना समृद्धी स्पोर्ट्स क्लब च्या वतीने सेपक टकराचा बॉल देऊन सन्मानित करण्यात आले व उपविजयी संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच 19 वर्षे वयोगट मुले पानगल प्रशाला विरुद्ध जय जवान सैनिक स्कूल यांच्यामधील सामना अतिशय रोमांचक ठरला.या सामन्यातील विजयी पानगल प्रशाला या संघास उत्पादन शुल्क अधिकारी मा. शोएब बेगमपुरे यांनी पंधराशे एक रुपयाचे बक्षीस रोख स्वरूपात देण्यात आले. या स्पर्धेत शहरातील 53 संघांनी भाग घेतला होता तसेच स्पर्धेचे आयोजन नीटनेटके व भव्य स्वरूपात करण्यात आले होते.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.

अंतिम निकाल

वयोगट 14 मुली

विजयी संघ :- राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, सोलापूर

उपविजयी संघ :- सेंट जोसेफ हाय.सोलापूर

तृतीय संघ :- पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश स्कूल सोलापूर

वयोगट 14 मुले

विजयी संघ :- एम.ए.पानगल हाय. सोलापूर

उपविजयी संघ :- सेंट जोसेफ हाय. सोलापूर

तृतीय संघ :- राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूर

वयोगट 17 मुली

विजयी संघ :- राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूर

उपविजयी संघ :- पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश स्कूल सोलापूर

तृतीय संघ :- सेंट जोसेफ हाय. सोलापूर

वयोगट 17 मुले

विजयी संघ :- एम.ए.पानगल हाय. सोलापूर

उपविजयी संघ :- जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा सोलापूर

तृतीय संघ :- सेंट जोसेफ हाय. सोलापूर

वयोगट 19 मुली

विजयी संघ :- सेंट जोसेफ हाय. सोलापूर

उपविजयी संघ :- पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश स्कूल सोलापूर

तृतीय संघ :- एम.ए.पानगल हाय. सोलापूर

वयोगट 19 मुले

विजयी संघ :- एम.ए.पानगल हाय. सोलापूर

उपविजयी संघ :- जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा सोलापूर

तृतीय संघ :- सेंट जोसेफ हाय. सोलापूर

रवींद्र चव्हाण
सहसचिव,सेपक टकरा असोसिएशन.