• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मी ‘अहिल्यादेवी’मधून उलगडला होळकरशाहीचा गौरवशाली इतिहास

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2026
in Blog
0
मी ‘अहिल्यादेवी’मधून उलगडला होळकरशाहीचा गौरवशाली इतिहास
0
SHARES
19
VIEWS

सोलापूर विद्यापीठात प्रा. कविता म्हेत्रे यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सप्ताहांतर्गत आज मंगळवारी ‘मी अहिल्यादेवी होळकर’ या प्रभावी एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण उत्साहात पार पडले. सातारा येथील प्रसिद्ध कलाकार प्रा. कविता म्हेत्रे यांनी हा नाट्यप्रयोग रसिकांसमोर सादर केला. त्यांनी आपल्या प्रभावी आवाज, संवादशैली आणि उत्कृष्ट भूमिकेच्या सादरीकरणातून होळकरशाहीचा जाज्वल्य इतिहास, अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कामांचा विस्तृत आढावा, तसेच त्यांच्या आदर्श राज्यकारभाराचे जिवंत दर्शन प्रेक्षकांसमोर उभे केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय डॉ. अनिल घनवट यांनी करून दिला.

नाट्यप्रयोगादरम्यान प्रा. कविता म्हेत्रे यांनी अहिल्यादेवींचे चरित्र, त्यांचा संघर्ष, प्रजेप्रती असलेले प्रेम, त्यांनी उभारलेली सामाजिक, धार्मिक आणि लोककल्याणकारी कामे, तसेच त्यांच्या दूरदर्शी आणि आदर्श राज्यकारभाराची झलक प्रभावीपणे मांडली. त्यांनी नाटकाद्वारे इतिहासातील महत्वाच्या घटना जिवंत केल्याने प्रेक्षकांना त्या काळातील राज्यव्यवस्था व अहिल्यादेवींचा करारी पण ममतामय स्वभाव यांचे दर्शन घडले.

यावेळी बोलताना माजी कुलगुरू डॉ. बंडगर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले लोककल्याणकारी कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताच्या वाटचालीसाठी सर्वांनी पुढे यावे. त्यांनी अहिल्यादेवींच्या दानशूर वृत्ती, विहिरी, घाट, धर्मशाळा, मंदिरे आदी उपक्रमांची आजही समाज उपयोगी असलेली परंपरा अधोरेखित केली.

कुलगुरू डॉ. महानवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, अहिल्यादेवींच्या कार्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यांनी दाखवलेल्या आदर्श मार्गावरून विद्यार्थी आणि युवकांनी प्रेरणा घेत जीवनात सकारात्मक बदल घडवावेत. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.

फोटो ओळी :
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘मी अहिल्यादेवी होळकर’ एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर, प्रा. कविता म्हेत्रे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदी.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

Next Post

सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक-जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

Related Posts

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका
Blog

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026
रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी
Blog

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!
Blog

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Blog

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026
लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे
Blog

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!
Blog

पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!

August 28, 2026
Next Post
सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक-जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक-जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026