येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तराखंडमधील केदारनाथपासून २ किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 जण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे.