येस न्युज नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चंद्रपूरमध्ये तर उन्हाचा कडाक्याने सर्वच विक्रम मोडले आहे. मागील तीन दिवसांत चंद्रपूरमधील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी चंद्रपूरमधील तापमान 44 अंशसेल्सिअसवर पोहचले आहे. 2019 मध्ये चंद्रपूरचे तापमान 47 अंशाच्या पुढे गेले होते. आता हा विक्रम मोडला जाणार का? याची चिंता चंद्रपूरकरांना लागली आहे. मार्च महिन्यामध्येच एवढी गर्मी पडली तर मग एप्रिल-मे महिन्यात तर काय होईल, याचा विचार करुनच नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी कामाशिवाय घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, नियमीत पाणी प्या, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेकांनी घरी कुलर्स, एसी सुरू केलेत. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही उन्हाच्या झळा पोहचतात. त्यामुळं माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही काळजी घ्यावी.
