सोलापूर : येथील शंकर लिंबोळे याने नामदेव चौगुले याच्या अंगावर ठिकाणी कुर्हाडीचे वार करून त्याला जागीच ठार मारले आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस निरीक्षक करण कोट अधिक तपास करीत आहेत.
दुधाच्या मापाने भावास मारहाण…
आदित्य नगर येथील श्री कृष्ण दुग्धालयात सचिन लक्ष्मण भोसले याने त्याचा भाऊ नितीन याला दुधाच्या एक लिटरच्या मापाने मारहाण केली. तसेच दुधात ढवलायचा पंजर डोक्यात मारून दुखापत केल्याने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस नाईक माडे अधिक तपास करीत आहेत.