• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2021
in मुख्य बातमी
0
कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेनेयापुढील काळात वेगवेगळया आजारांवरील लसींबाबत संशोधन यावर भर देणे आवश्यक असून यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. हाफकिन संस्थेने केलेले संशोधन निर्मितीकरीता येणाऱ्या काळात हाफकिन महामंडळाकडे देणे आवश्यक आहे. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टियूटने पुढाकार घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिटयूटला भेट दिली. हाफकिन इन्स्टिटयूट येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिटयूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उषा पद्मनाभन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येत असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रात कोविड लसीकरण करण्यावर भर देण्यात आहे. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी.

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येत आहे. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात यावा. उत्कृष्ट दर्जाच्या लस निर्मिती व पुरवठा करण्यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिनने औषध निर्माण करण्याबरोरबच कोविड लस निर्मितीसाठी आयसीएमआर/भारत बायोटेक लिमिटेडकडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळाल्यास लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश ( Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ लाख कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असेहीमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कोविड लसीच्या लवकर उपलब्धतेसाठी हाफकिन महामंडळाच्या परळ आणि पिंपरी येथे उत्पादन सुविधा उपलब्ध असल्याने येथील उपलब्धता लक्षात घेऊन यादृष्टीने काम सुरु करण्यात यावेत. हाफकिन महामंडळाच्या पोलिओ लस उत्पादन सुविधेची असलेली वार्षिक उत्पादन क्षमतेबरोबरच कोविड लसींचा निर्मिती आणिपुरवठाही वाढविण्यात यावा. परळ येथील हाफकिन संस्थेत कालमर्यादेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी उपलब्ध असणारी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ञ मनुष्यबळाची तरतूद या सगळया बाबी तपासून घ्याव्यात.हाफकिनमार्फत एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत अंदाजे १२ कोटी ६० लाख लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱ्या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करण्यात यावी असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल. भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे.

Previous Post

संपूर्ण लॉकडाऊनऐवजी निर्बंध कडक करावेत : देवेंद्र फडणवीस

Next Post

पंढरपूर । चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या

Related Posts

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
Next Post
पंढरपूर । चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या

पंढरपूर । चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या

ताज्या बातम्या

महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026