मुंबई : गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली, त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते मुंबईत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “देशात एक वेगळं वातावरण आहे नुकतेच निवडणुका पार पडल्या. या निवडणुका एक वेगळी दिशा दाखवायला लागली आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली. त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं, तसा निकाल आता पाहायला मिळत आहे. पण गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशात एका बाजूने मतप्रवाह आहे असा नाही. कारण दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आपने खेचून आणली”