• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2026
in मुख्य बातमी
0
गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश
0
SHARES
0
VIEWS

नालेसफाई गैरव्यवहार प्रकरणी ठपका असलेले दोन्ही अधिकारी एकाच विभागात कार्यरत राहणार

महापालिका आयुक्तांच्या आदेशाने चर्चेला उधाण

ही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चेष्टाच : नगरसेवक जाधव

सोलापूर : महापालिकेतील नालेसफाई कामातील कथित गैरव्यवहार प्रकरणावरून प्रशासन आधीच संशयाच्या भोवऱ्यात असताना आता या प्रकरणाशी ठपका असलेले संबंधित अधिकारी पुन्हा एकाच परिवहन विभागात कार्यरत होणार आहेत. कनिष्ठ अभियंता गिरीश पुकाळे यांची परिवहन विभागात बदली करण्यात आली असून उपअभियंता सारिका आकुलवार यांच्याकडे यापूर्वीच परिवहन विभागासह अन्य चार विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.


महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यासंदर्भात कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परिवहन विभागातील गिरीश पुकाळे यांना नगर अभियंता विभागाकडे प्रतिनियुक्तीने काम पाहण्यास सांगण्यात आले होते. तर महापालिकेच्या नगर अभियंता विभागातील कनिष्ठ अभियंता आकाश प्रमोद किर्तने यांची परिवहन विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आता या दोघांच्या प्रतिनियुक्त्या संपुष्टात आणून त्यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आकाश किर्तने यांना नगर अभियंता विभागातील वाहन विभागात तर गिरीश पुकाळे यांना परिवहन विभागात काम पाहावे लागणार आहे.


दरम्यान, नालेसफाईतील कथित गैरव्यवहारप्रकरणी तक्रारदार तथा भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी जबाबदाऱ्यांचे वाटप केले जात असल्याचा आरोप नगरसेवक जाधव यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सारिका आकुलवार यांच्याकडे परिवहन विभागासह अन्य चार विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातच आता गिरीश पुकाळे यांचीही परिवहन विभागात नियुक्ती झाल्याने दोन्ही अधिकारी एकाच विभागात कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे नालेसफाई गैरव्यवहाराच्या चौकशीवर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना एकच विभागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यामागील प्रशासनाची भूमिका काय तसेच चौकशी निष्पक्ष होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे का असे सवाल नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे. या गंभीर प्रकरणी अशा पद्धतीने आदेश काढून वरिष्ठांकडून जणू चेष्टाच केली जात असल्याचे असल्याचा आरोप नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे.

Previous Post

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या नूतन समादेशक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

Related Posts

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 28, 2026
टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 28, 2026
सोलापूरकरांच्या अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर ऐतिहासिक तोडगा; दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा!
मुख्य बातमी

सोलापूरकरांच्या अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर ऐतिहासिक तोडगा; दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा!

November 28, 2026
दिव्यांगाचा विशेष कायदा अधिकार पण जाणीव जागृती व्हावी -ऍड. उदय वारुंजीकर
मुख्य बातमी

दिव्यांगाचा विशेष कायदा अधिकार पण जाणीव जागृती व्हावी -ऍड. उदय वारुंजीकर

November 28, 2026
सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!
मुख्य बातमी

सत्तेचा रुबाब की संयमाचा अभाव? दोन आमदारांच्या वारंवारच्या वादांनी चर्चेला उधाण!

November 28, 2026
सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची ऐकी कोरोना महामारीपेक्षाही घातक! सचिन पाटील यांचा घणाघाती आरोप
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची ऐकी कोरोना महामारीपेक्षाही घातक! सचिन पाटील यांचा घणाघाती आरोप

November 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

November 29, 2026
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या नूतन समादेशक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या नूतन समादेशक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

November 28, 2026
पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026