१,३५०.६७ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना; सोलापूरच्या विकासातील या ऐतिहासिक क्षणाचा महापौर म्हणून मला साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले!
सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने आज डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री लार्स लॉके रासमुसेन (Lars Løkke Rasmussen), भारतातील डेन्मार्कचे राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेनसेन (Rasmus Abildgaard Kristensen) आणि डॅनिश इंडस्ट्रीचे (Dansk Industri) प्रतिनिधी जेकब हार्टिग फेबर (Jakob Hartig Faber) यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या ऐतिहासिक कराराचा महापौर म्हणून मला साक्षीदार होता आले, याचा मनस्वी आनंद आणि सार्थ अभिमान आहे.
महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भक्कम पाठबळामुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या मोलाच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने, तसेच सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी मिळाली. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचे समस्त सोलापूरकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.



जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या १,३५०.६७ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सोलापूरकरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मोठी मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, या योजनेच्या पुढील १० वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीची (मेंटेनन्स) संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीकडेच राहणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दररोज नियमित, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ही योजना सोलापूरकरांसाठी वरदान ठरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मोलाचे सहकार्य व योगदान देणारे डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री लार्स लॉके रासमुसेन, भारतातील डेन्मार्कचे राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेनसेन, डॅनिश इंडस्ट्रीचे प्रतिनिधी जेकब हार्टिग फेबर, जागतिक बँकेचे आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे सर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सर, सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेशजी चौबे तसेच सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांचेही मनःपूर्वक आभार!
सोलापूरकरांच्या अनेक वर्षांच्या अपेक्षांना न्याय देणाऱ्या या ऐतिहासिक वाटचालीत महापौर म्हणून मला सहभागी होता आले, ही माझ्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत आनंदाची, अभिमानाची आणि अविस्मरणीय बाब आहे.











