• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोल्ह्याला द्राक्षे आंबट तर बिबट्याला गोड !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2023
in मुख्य बातमी
0
कोल्ह्याला द्राक्षे आंबट तर बिबट्याला गोड !
0
SHARES
1
VIEWS
  • दिंडोरी (नाशिक) : कोल्ह्याला झाडावर चढून द्राक्ष खाता येत नाही, त्यामुळे तो द्राक्ष बागेत कोकलतो, त्यावरून एक म्हण पडली आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट…, पण बिबट्याने द्राक्ष बागेत झेप घेत ओरबाडून द्राक्षाची चव चाखली आहे; त्यामुळे बिबट्याला द्राक्षे गोड ही नवीन महान रुजू होणार का अशी चर्चा सध्या शेतकरी कुटुंबात होत आहे.
  • दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे मागील वर्षभरापासून दोन बिबटे व दोन पिल्ले गावाच्या उत्तर बाजूस असलेल्या डोंगर परिसरात राहत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहेत. नाशिकच्या आंबट गोड द्राक्षांनी परदेशातदेखील अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे. आता मानवी वस्तीत राहणारा बिबट्यादेखील द्राक्ष खात असल्याचे आढळून आले आहे. बिबट्याने चक्क दोन ते तीन द्राक्ष घड खाल्ल्याचे दिसून आले. भाऊसाहेब पुंडलिक मोरे यांच्या शेतात द्राक्ष काढणीसाठी तयार झाली आहेत.
  • नेहमीप्रमाणे त्यांचे बंधू अशोक पुंडलिक मोरे बागेतून जवळच असलेल्या परशराम बाबा यांच्या समाधीच्या पूजेसाठी जात असतात. यावेळी बागेतून ओरडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडताच त्यांनी खाली बसून बघितले तर बागेत बिबट्या दूरवर आढळून आला. बिबट्या आपल्या पंजाने बागेच्या वेलीवर ओरखडत होता व द्राक्ष खाली पाडत होता. यावेळी मोरे यांनी जवळच असलेल्या घरामधील व्यक्तींना आवाज देताच बिबट्याने धूम ठोकली. आता दिवसाढवळ्यादेखील बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. बिबट्याने पाच-सहा दिवसांपूर्वी रत्नगडजवळ राहत असलेले कचरू पवार व सुनील गांगुर्डे यांच्या घराजवळून कुत्र्याला ओढत नेऊन ठार केले. मीराबाई गांगुर्डे यांनी सकाळी ८.३० वाजता बिबट्या घरासमोरच्या शेतातून जात असताना बघितला.
  • पिंजरे वाढविण्याची मागणी
    आठ दिवसांपूर्वी मेंढपाळ ताराचंद ढेपले हे रात्री कांद्याच्या शेतात मुक्कामी होते. परिसरात असणाऱ्या बिबट्याने रात्री १.३० वाजेच्या सुमारास शेळ्या-मेंढ्याच्या कळपात घुसून हल्ला केला. मेंढ्यांच्या आवाजाने ढेपले हे जागे झाले व कोकरू ठार करून बिबट्याने बोकड पकडल्याचे दिसून आले. बोकड वाचवण्यासाठी ढेपले यांनी आरडाओरडा केला. मात्र, त्यानंतर बिबट्या पळून गेला; पण बिबट्याच्या दहशतीने रात्री शेतात शेतकरी जीव मुठीत घेऊन आपल्या पिकाला पाणी देतात. आता तर दिवसाढवळ्या बिबट्या दर्शन देत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबटे पकडण्यासाठी पिंजरे वाढवण्याची मागणी शिंदवड ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

कियारा अडवाणीचा स्टायलिश क्रोम यलो को-ऑर्डर सेट लुक!

Next Post

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोर राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोर राहुल कलाटे यांचे  डिपॉझिट जप्त

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोर राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026