संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पंडित दादासाहेब पाटील यांची ग्रंथतुला

0
21

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचे संगीत भूषण असलेले व कलापिनी संगीत विद्यालय पंढरपूरचे संचालक ज्येष्ठ तबला वादक पं. दादासाहेब पाटील यांच्या ७१ वर्षपूर्ती तसेच त्यांच्या पत्नी सौ. लता पाटील यांच्या ६५ निमित्ताने व त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे ग्रंथतुला व भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील विशेषता: ग्रामीण भागातील मुलांसाठी कलापिनी संगीत विद्यालयाच्या माध्यमातून सलग ४५ वर्ष तबला शिक्षण देण्याचे काम केले आहे. अनेक गोर गरीब मुलांना त्यांनी मोफत संगीत विशारद , संगीत अलंकार पर्यंतचे तबला प्रशिक्षण दिले आहे. कलापिनी संगीत महोत्सवाच्या माध्यमातून अनेक युवा व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलकारांना व्यासपीठ मिळवुन दिले आहे. ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे ,डॉ. विकास कशाळकर, ह.भ.प. शुभांगीताई मनमाडकर , ह. भ.प. चैतन महाराज देगलूरकर,ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर , सुनिता राहिरकर, किरण घाडगे,अभिजीत पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. शेकडो रसिक व संगीत प्रेमी व मान्यवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन उपस्थित राहिले होते.