• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासन आपल्या दारी उपक्रमपासून एक ही पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2023
in इतर घडामोडी
0
शासन आपल्या दारी उपक्रमपासून एक ही पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.:- ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी पंढरपूर येथे होत आहे. आपल्या जिल्ह्याला 75 हजार शासकीय योजनांचे लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तरी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंढरपूरचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका आशिष लोकरे व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. सर्व संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी निवडलेल्या लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव पत्ता व मोबाईल क्रमांकासह यादी विहित प्रपत्रात भरून प्रशासनाला सादर करावी. दिनांक 1 एप्रिल 2023 पासून शासकीय योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची नावे पाठवावीत. आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन सर्वेक्षण केलेले व योजनेसाठी पात्र असलेला एकही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या अकरा तालुक्यातील विविध गावांमधून पंढरपूर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जवळपास 30 ते 35 हजार लाभार्थी येण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर येथील कोर्टी- वखारी रस्ता, गट क्रमांक 24 येथे हा कार्यक्रम होणार असून यासाठी जलरोधक मंडप, बॅरेकेटींग व अन्य कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच प्रत्येक गावातून लाभार्थी कार्यक्रम ठिकाणी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे आवश्यक असलेल्या बसेसचा पुरवठा करण्याची मागणी केली असून त्यानुसार सोलापूर व अन्य जिल्ह्यातून महामंडळाकडून बसेस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखावर देण्यात आलेली जबाबदारीचे आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहेत, त्यानुसार प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले. कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी या कार्यक्रमासाठी तयार करण्यात येत असलेले, जलरोधक मंडप,व्यासपीठ, पार्किंग व्यवस्था, लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागासाठी 50 स्टॉल या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

Tags: beneficiarybenefitsCollector Kumar AshirwadGovernmentgovernment schemes
Previous Post

माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार लवकर द्यावा या संघाने दिले CEO ना पत्र…

Next Post

व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळास महत्त्व द्या: अमित कुलकर्णी सोलापूर विद्यापीठात खेळाडू व गुणवंतांचा झाला सन्मान

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळास महत्त्व द्या: अमित कुलकर्णी सोलापूर विद्यापीठात खेळाडू व गुणवंतांचा झाला सन्मान

व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळास महत्त्व द्या: अमित कुलकर्णी सोलापूर विद्यापीठात खेळाडू व गुणवंतांचा झाला सन्मान

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026