माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार लवकर द्यावा या संघाने दिले CEO ना पत्र…

0
24

सोलापूर; उपरोक्त विषयानुसार सोलापूर जिल्हयाचे माध्यमिक विभागचे शिक्षणाधिकारी वारंवार रजेवर जात असल्याने शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झालेले आहे. अनेक माध्यमिक शाळांचे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे कामे केवळ शिक्षणाधिकारी नसल्यामुळे खोळंबलेले आहे त्याचा विपरीत परिणाम होत असुन शालेय प्रशासकीय कामकाजात अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत.
सर्वात महत्वाचे सुमारे बारा तेरा वर्षापासुन विना वेतन काम करणा-या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शासानाने वीस टक्के अनुदान जाहिर केलेले आहे. या शिक्षकांना वेतन मिळणे कामी त्यांचे शालार्थ वेतन प्रणालित नाव समाविष्ट होणे गरजेचे आहे. केवळ जिल्हयाला जिल्हा शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्या कारणाने सदरहु शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वेतनापासुन वंचित होत आहेत. यासाठी जिल्हयाला शिक्षणाधिकारी असणे नितांत गरजेचे आहे.

जिल्हयाच्या माध्यमिक शिक्षण विभागात लिपकि संर्वगीय पदावर विविध शाळेतील अतिरिक्त झालेले कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचा-यांना शिक्षण विभागाचा कार्यालयीन कामकाजाचा अनुभव नाही. तसेच जिल्हा परिषद विभागातील माध्यमिक शिक्षण विभागाचा अनुभव असलेला कर्मचारी वर्ग शिक्षण विभागास उपलब्ध करून द्यावे. उपरोक्त सर्व कारणांचा विचार केला असता माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार लवकरात लवकर अनुभवी व सक्षम अधिका-याकडे सुपूर्त करावे ही विनंती.