• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देव आश्रमात आला… ज्येष्ठांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2026
in इतर घडामोडी
0
देव आश्रमात आला… ज्येष्ठांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
0
SHARES
1
VIEWS

वात्सल्य आस्था वृद्धाश्रमात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदीकौल काठीचे पूजन

सोलापूर :सोलापूरची ओळख, सोलापूरचा श्वास असलेले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज. यात्रेची चाहूल लागताच संपूर्ण सोलापूर भक्तिभावाने न्हाऊन निघतो. पांढरे शुभ्र वस्त्र, घराघरांत सडा-रांगोळ्या आणि नंदीकौल काठ्यांच्या विवाह सोहळ्याचे आकर्षण अनुभवण्यासाठी प्रत्येक सोलापुरकराची धडपड सुरू होते. मात्र, वयाच्या संध्याकाळी उभे असलेले, चालणंही कठीण झालेले आश्रमातील ज्येष्ठ या आनंदापासून अनेकदा वंचित राहतात.हीच भावना ओळखून आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील वात्सल्य आस्था अनाथ वृद्धाश्रमात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदीकौल यांचे विधिवत पूजन भक्तिभावाने पार पडले.

अवघ्या सात दिवसांवर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस प्रारंभ होत असून, यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षता सोहळा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अनुभवता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदीकौलाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू व मलकु म्हेत्रे मास्तर तसेच आश्रमातील आजी आजोबा व आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य यांच्या हस्ते नंदीकौलाचे पूजन करण्यात आले.या पूजनामुळे आश्रमात जणू यात्रेचे पावन वातावरण अवतरले. अक्षता उधळताना काही आजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर काही आजोबांचे हात नकळत देवाकडे जोडले गेले. “आज सिद्धराम आमच्याकडेच आले,” अशी भावनिक प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केली.

सोलापूरच्या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेला नंदीकौल काठ्यांचा विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहण्याची संधी अनेक वृद्धांना मिळत नसल्याने, देवाचे नंदीकौल थेट वृद्धाश्रमात आणून पूजन करण्याचा हा उपक्रम वृद्धांसाठी अविस्मरणीय ठरला. या माध्यमातून त्यांना यात्रेतील पवित्र परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.यावेळी आश्रमामधील आजींना व आजोबांना एक नवीन धार्मिक कार्य केल्यामुळे खूप आनंदित उत्साहीत होते

या भावपूर्ण उपक्रमासाठी आस्था फाऊंडेशनचे सर्वेसर्वा विजय छंचुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी निलिमा हिरेहठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, विद्या सिंगम, स्नेहा वनकुद्रे, स्नेहा मेहता, ज्योस्त्ना सोलापूरकर, सुरेखा पाटील, पांढरे, माधवी अदे, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, ललिता सिंघम, प्रकाश डोंगरे, महावीर मेहता, गीता दळवी, अभिजीत भोसले, भाग्यश्री भोसले, सत्यम सोलापूरकर, शशिकला पांढरे,आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला. परिसरातील नागरिकांनीही या पवित्र सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

वासल्य आस्था निराधार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापिका रेखा घटे व रजनी भाटिया हे पण उपस्थितीत होते.कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद व शिरा व केळी बिस्किट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. देव येऊन गेल्याची ऊब मात्र आश्रमातील ज्येष्ठांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहिली.

Previous Post

मकर संक्रांती आणि होळी सणांच्या निमित्ताने रेल्वेकडून कलबुरगि-बंगळूरु कॅन्ट.

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026