• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गॅस एजन्सीनी 23 मार्च पासून 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2026
in इतर घडामोडी
0
गॅस एजन्सीनी 23 मार्च पासून 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS

*गुढी पाडवा व रमजान ईद हे सण झाल्यानंतर 23 मार्चपासून एकाही गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडर साठी लाईन लागणार नाही याची दक्षता घ्या

*जिल्ह्यात घरगुती गॅसचा मागणीप्रमाणे पुरवठा होत असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर 96 तासात घरपोच गॅस मिळणार

*गुढी पाडवा व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने शहर व ग्रामीण भागात गॅस एजन्सी असलेल्या भागात पेट्रोलिंग करावे

*एलपीजी गॅस सिलेंडर बाबतच्या तक्रारी 9769919221 या व्हाट्सअप क्रमांकावर कराव्यात

सोलापूर – गुढी पाडवा 19 मार्च व रमजान ईद हा सण 21 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. त्यानंतर 23 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीनी गॅस वितरणात एकसूत्रता राखण्याकरता गोदाम, गॅस एजन्सी व इतर ठिकाणाहून गॅस सिलेंडरचे वितरण करू नये. जिल्ह्यात सर्वत्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर ओटीपी द्वारे 96 तासात घरपोच करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

 सोलापूर जिल्ह्यातील गॅस वितरणा संदर्भातील कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, एलपीजी गॅस पुरवठा करणारे जिल्हा समन्वयक अधिकारी भुकय्या रघुकुमार यांच्या सह सोलापूर शहर व जिल्ह्यातील गॅस एजन्सी चे प्रतिनिधी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर बाबत 23 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील एकाही गॅस एजन्सी कडून रांगेत उभा राहून ग्राहकांना गॅस सिलेंडर देऊ नये. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ओटीपी द्वारे 96 तासात संबंधित एजन्सीने ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. आपल्या गॅस एजन्सी व गोदाम समोर ऑनलाइन बुकिंग, घरपोच सेवेद्वारे गॅस मिळेल एजन्सी मध्ये गॅस मिळणार नसल्याबाबतचे बोर्ड दर्शनी भागात लावावेत. तसेच त्याबाबतचे एसएमएस आपापल्या ग्राहकांना मोबाईलवर पाठवावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. 

जिल्ह्यात एलपीजी चा पुरवठा मागणीप्रमाणे होत आहे. तरी संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करावा. कंपनीच्या स्तरावर गॅस विक्रेत्या साठी ज्या सूचना असतील त्या लेखी स्वरूपात गॅस विक्रेत्यांना द्याव्यात. दुसरे गॅस सिलेंडर वाटप शहरी भागात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवस आहे त्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. गॅस एजन्सीने कोणताही अवैध व्यापार होणार नाही याकरिता आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. जर कुठेही असे होत असेल तर त्याबाबतची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी. संवेदनशील गॅस एजन्सी ची माहिती पुरवठा विभागाला द्यावी. त्याप्रमाणे त्या एजन्सीला पोलीस संरक्षण देण्याबाबत पोलीस विभागाला कळविण्यात येईल. तसेच पोलीस विभागाने रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सी समोर खरेदी होऊ नये याकरिता शहरी व ग्रामीण भागात पेट्रोलिंग करावे असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

  एलपीजी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्याचे जिल्हा समन्वयक अधिकारी श्री. रघुकुमार यांनी गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल यांच्याकडून एजन्सीसाठी आलेल्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात मागणीप्रमाणे एलपीजी गॅस पुरवठा मिळत असल्याचे सांगून 23 मार्च 2026 पासून ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ओटीपी द्वारे 96 तासात गॅस सिलेंडर एजन्सी उपलब्ध करून देतील, असे त्यांनी सांगितले.प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी ग्रामीण भागातील गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने माहिती दिली तर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सोलापूर शहरात एलपीजी गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने माहिती दिली. 
Previous Post

सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा झाला झेडपी अध्यक्ष तर इंदाभाऊला निष्ठेचे फळ

Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026