यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका

0
21

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. इशिता किशोरने परीक्षेत ऑल इंडिया प्रथम रँक मिळवला आहे. तिच्या पाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर लॉग इन करून निकाल तपासता येईल. आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.