• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वाहनांचा विमा उतरवण्याचे आमिष दाखवत तीन कोटी रुपयांची फसवणूक, मुख्य आरोपीला सोलापूर पोलिसांच्या बेड्या.

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2023
in इतर घडामोडी
0
वाहनांचा विमा उतरवण्याचे आमिष दाखवत तीन कोटी रुपयांची फसवणूक, मुख्य आरोपीला सोलापूर पोलिसांच्या बेड्या.
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : कमी किमतीत वाहनांची विमा पॉलिसी उतरवण्याचे आमिष दाखवत तब्बल तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सोलापुरात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देशभरातील विविध राज्यातील सतराशे ग्राहकांची आणि एका विमा कंपनीची तीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. यातील मुख्य आरोपीला सोलापूर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.

एका विमा कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर विनय रामकृष्ण मंत्री यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून मुख्य आरोपी अजय कोरवार याच्यासह एका साथीदार विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही आरोपींनी 2022 ते 2023 या दरम्यान एका इन्शुरन्स कंपनीचे एजंट असल्याचे अनेकांना भासविले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश, राजस्थानमधील मोटार वाहनधारकांना कमी किमतीचा प्रीमियम देतो असे आमिष दाखवले. चार चाकी गाडी आणि ट्रक सारख्या वाहनाचे बनावट पॉलिसी काढून वाहनधारकांची आणि कंपनीची फसवणूक केली. यात एकूण दोन कोटी 93 लाख 68 हजार 836 रुपयांची फसवणूक झाल्याबाबत फिर्याद देण्यात आली.

सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल होताच सोलापूर पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. मुख्य आरोपी अजय कोरवार हे कर्नाटकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने लागलीच कर्नाटकात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान मुख्य आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली.

फसवणूक होतं असल्याचा कंपनीला आला होता अंदाज, आरोपीच्या मागावर होते कंपनीचे पथक
इन्शुरन्स कंपनीच्या फ्रॉड कंट्रोल युनिटला या घटनेची कुणकुण लागली होती. 2022 23 या वर्षांमध्ये एकाच इसमाने अनेक वाहनांची पॉलिसी काढल्याचे कंपनीच्या वेबसाईटवर लक्षात आले होते. कंपनीने या संदर्भात तपास केल्यानंतर या व्यक्तीने दुचाकी वाहनाच्या पॅकेज मध्ये अवजड चार चाकी वाहने, तीन चाकी रिक्षा अशा वाहनांची बनावट पॉलिसी काढल्याचे लक्षात आले. योग्य पॉलिसीनुसार या सतराशे वाहनांच्या पॉलिसीचे रक्कम ही जवळपास तीन कोटी सात लाख 19 हजार रुपये इतकी होते. मात्र आरोपीने दुचाकीची पॉलिसी खरेदी करतं केवळ 13 लाख 50 हजार रुपये भरले. यामुळे कंपनीचे दोन कोटी 93 लाख 68 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हे प्रकार लक्षात आल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीचे पथक आरोपींच्या मागावर होते. पथकाला योग्य पुरावे प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला

Previous Post

मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन

Next Post

रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या माध्यमातून गारमेंट पार्क ची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल – सुभाष देशमुख

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या माध्यमातून गारमेंट पार्क ची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल – सुभाष देशमुख

रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या माध्यमातून गारमेंट पार्क ची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल - सुभाष देशमुख

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026