मनिष देशमुख यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशन अंतर्गत लोटस योजनेतून पाच विद्यार्थ्यांना एकूण 73 हजारांचे शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात आले. संचालक मनीष देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पालकांना धनादेश वाटप करण्यात आले.
या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत, दरवर्षी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लोकमंगल फाउंडेशन मदत करते. त्यांचा शैक्षणिक खर्च उचलून, त्यांच्या भविष्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी हे आमचे छोटेसे योगदान आहे, असे यावेळी मनिष देशमुख यांनी संागितले. लोकमंगल फाउंडेशनच्या लोटस योजनेद्वारे वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरूवात 2015 मध्ये करण्यात आली. आतापर्यंत 203 विद्यार्थ्याना दत्तक घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एकूण 82 लाख 49 हजारांची स्कॉलरशिप देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला लोटस कोअर कमिटीचे प्रा. विलास मोरे, डॉ. प्रवीण ननवरे, आकाश अदाटे व विद्यार्थी उपस्थित होते.











