टिकेकर रेल्वे स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण

0
25

दिनांक 30.07.2023 रोजी “झाडे लावा झाडे जगवा” ग्रुप व रेल्वे विभागाच्या पुढाकाराने ओसाड जागेवर टिकेकर स्टेशन रेल्वे हद्दीत (दोन एकर क्षेत्रावर) एकूण 1000 झाडा पैकी 550 स्थानिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले ज्यामध्ये प्रमुख वड, पिंपळ, उंबर, चिंच, बांबू व इतर अनेक विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षीय पाहुणे म्हणून नीरज कुमार दोहरे , मंडल रेल प्रबंधक/सोलापूर व सरिता दोहरे यांना आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवाजी कदम,व.मं.संरक्षा अधिकारी, प्रतिभा कदम, माऊली झांबरे, काकासाहेब भोसले व व्ही.जी.आलुरे, प्रवीण तळे, अजित माने हे उपस्थित होते.माननीय नीरज कुमार दोहरे व सरिता दोहरे तथा शिवाजी कदम व प्रतिभा कदम या दाम्पत्याचा हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर शहरातील या वृक्षारोपण लागवडीसाठी, वृक्षसंपदा संरक्षण व संवर्धनासाठी माऊली कन्स्ट्रक्शन,सकाळ फाउंडेशन, किर्लोस्कर कंपनी, बालाजी सरोवर,जयोस्तुते फाउंडेशन, रेल्वे विभाग यांनी विविध माध्यमाद्वारे पर्यावरण पोषक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक पाऊले उचलण्यास सुरूवात केलेली आहे, यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय नीरज कुमार दोहरे यांनी सोलापूर रेल्वे विभागाकडून पर्यावरण संबंधित केल्या गेलेल्या उपाययोजना ज्यामध्ये पाच मियावायाकी सघन वनांची निर्मिती, रेन हार्वेस्टिंग, सिव्हेज वाटर प्रकल्प इत्यादी बाबत माहिती दिली व भविष्यात सोलापूर रेल्वे विभागाकडून पर्यावरण संवर्धन विषयक सहाय्यता देण्याची प्रतिबद्धता मान्य केली व तसेच शिवाजी कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी रेल्वेच्या खाली जमिनीवर अधिकाधिक वृक्षारोपण करून अतिक्रमणाला व्यापक आळा घालता येईल व पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीचा मानस प्रतिपादन केला.

प्रवीण तळे यांनी रेल्वे अधिग्रहित 600 एकर खाली जमिनीवर भविष्यात तीन लाख झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले ज्यामुळे सोलापूर शहरांचे तापमान सर्वांच्याच सहकार्यातून हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.पर्यावरण प्रेमी श्री परशुराम लांबतुरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली “झाडें लावा झाडे जगवा” या चळवळीचे एकूण 52 ग्रुप सद्या कार्यरत असल्याचे सांगितले व सातत्याने झाडांची रोपन व निगा राखली जात असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी समीर शेख,अध्यक्ष ब्रम्हदेव माने सामाजिक संस्था यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षांच्या हस्ते जम्मा व तंबाके सर यांचा त्यांनी केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व रेल्वे इंजिनिअरींग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या वेळी रेल्वे विभागाचे मनोज आमले, संजय उस्तुर्गे, एस.कोरे, मुकेश कुमार ,संगापुरे, योगेश व झाडे लावा झाडे जगवा ग्रुपचे सदस्य व अन्य पर्यावरण प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.