माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी; कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्थ वाढवला

0
20

सातारा ( सुधीर गोखले ) – कराड दक्षिण चे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञात व्यक्तीने इमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस येताच त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून त्यांच्या पाटण कॉलनी कराड येथील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात कराड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आल्याचे समजते मात्र अद्याप पोलीस प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला नाही.


शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे एका सभेमध्ये महात्मा गांधी याना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते त्या त्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संभाजी भिडे यांच्यावर कारवाई ची मागणी करावी यासाठी आग्रही भूमिकेमध्ये दिसून आले. तसेच सध्या राज्यभरातच नाही तर देशात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाई बाबत आक्रमक झाल्यानंतरच हा ईमेल त्यांना आला असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर त्यांच्या कराड येथील त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ केली असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.