• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 3, 2026
in मुख्य बातमी
0
SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या 17 ने वाढून 3,740

राजकीय पक्षांनी उपजिल्हा निवडणूक कार्यालयातून प्रारूप मतदार यादी घेऊन जाण्याचे आवाहन

अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार

सोलापूर – जिल्ह्यात 17 जून 2026 रोजी एकूण मतदार संख्या 39,41,095 इतकी होती. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची संख्या 33,18,424 इतकी झाली आहे. या प्रारूप यादीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ASDD यादीत 6,22,671 मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदार म्हणून समावेश करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात SIR संदर्भात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, 31 ऑगस्ट 2026 रोजी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपजिल्हा निवडणूक कार्यालयातून प्रारूप मतदार याद्या घेऊन जाव्यात. तसेच मतदार यादीबाबत काही दावे अथवा हरकती असल्यास त्या विहित मुदतीत दाखल कराव्यात. SIR अंतर्गत जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही, या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात यापूर्वी 3,723 मतदान केंद्रे होती. त्यामध्ये 17 नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून, आता जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 3,740 झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिली.

बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीत अनुपस्थित अथवा स्थलांतरित झालेल्या मतदारांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती विचारली. तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान केंद्र शक्यतो एकच राहील, या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

*SIR कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक-
जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आली. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, दावे व हरकती दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

*मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण
SIR अंतर्गत जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 3,740 झाली आहे. यामध्ये 17 नवीन मतदान केंद्रांचा समावेश असून, 39 मतदान केंद्रे विलीन करण्यात आली आहेत. तसेच 27 मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे.
सर्वाधिक बदल सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात झाले असून, या मतदारसंघात 3 नवीन मतदान केंद्रे सुरू करण्यात आली, 11 मतदान केंद्रे विलीन करण्यात आली, तर 7 मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे.

*प्रारूप मतदार यादीतील आकडेवारी-
17 जून 2026 रोजी जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 39,41,095 होती. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ही संख्या 33,18,424 इतकी झाली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 17,09,471, महिला मतदारांची संख्या 16,08,709, तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 244 इतकी आहे.

*ASDD मतदार यादी-
31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ASDD यादीत एकूण 6,22,671 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या 1,70,696 मतदारांचा, आधीच नोंद असलेल्या 1,05,941 मतदारांचा, अनुपलब्ध अथवा अनुपस्थित 1,34,302 मतदारांचा, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या 2,10,391 मतदारांचा, तर इतर कारणांमुळे 1,403 मतदारांचा समावेश आहे.

*सुनावणी व नोटिसा-
31 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये 5,09,067 मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती अथवा मॅपिंगचा अभाव आढळून आला आहे. अशा प्रकरणांमध्ये नोंदीतील अनियमितता, नोंदणीचा अभाव, नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक 6, दुरुस्ती अथवा स्थलांतरासाठी फॉर्म क्रमांक 8 आणि नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक 7 यासंदर्भात आवश्यकतेनुसार नोटिसा देण्यात येणार आहेत.

*संकेत स्थळे -प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी: https://solapur.gov.in/en/notice/special-intensive-revision-2026-draft-eletoral-roll/ (solapur.gov.in in Bing)

ASDD यादी पाहण्यासाठी: https://solapur.gov.in/en/notice/asdd/ (solapur.gov.in in Bing)

ऑनलाइन नाव नोंदणीसाठी: https://voters.eci.gov.in/ (voters.eci.gov.in ).

Previous Post

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

Next Post

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Related Posts

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
Next Post
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026