• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कर्तव्य कृतज्ञता आणि प्रेरणा : प्रिसिजन गप्पा 2025 चा अर्थपूर्ण समारोप

Yes News Marathi by Yes News Marathi
November 9, 2025
in मुख्य बातमी
0
कर्तव्य कृतज्ञता आणि प्रेरणा : प्रिसिजन गप्पा 2025 चा अर्थपूर्ण समारोप
0
SHARES
1
VIEWS

प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित “प्रिसिजन गप्पा 2025” या सांस्कृतिक मेजवानीचा तिसरा आणि अंतिम दिवस सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी अर्पण करण्यात आला. सामाजिक जाण आणि योगदानाचा गौरव करणाऱ्या या दिवशी, शहर आणि जिल्ह्यातील दहा कार्यकर्त्यांना ‘प्रिसिजन सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुहासिनी शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर सन्मान सोहळ्याची मुख्य सूत्रधार म्हणून प्रख्यात वक्ते, पत्रकार आणि मुलाखतकार डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सुमेधा चिथडे यांना ‘प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’

सोल्जर्स इंडिपेन्डंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सियाचेन या जगातील सर्वोच्च रणभूमीवर ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करून तेथील सैनिक आणि पर्यटकांना जीवनदायी श्वास देण्याचे कार्य श्रीमती सुमेधा चिथडे यांनी केले आहे. तसेच सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांचे पुनर्वसन करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या अद्वितीय सेवेसाठी त्यांना ३ लाख रुपयांचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अधिक कदम यांना ‘सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार’

बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवाद, युद्ध आणि अराजकतेमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींच्या पुनर्वसनाचे कार्य अधिक कदम यांनी गेल्या ३० वर्षांपासून निष्ठेने केले आहे. कुपवाडा, अनंतनाग, जम्मू अशा संवेदनशील भागांमध्ये शिक्षण, आश्रय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे त्यांचे योगदान विलक्षण आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा सन्मान म्हणून त्यांना २ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेला “प्रिसिजन सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. उदय निरगुडकर यांनी सुमेधा चिथडे आणि अधिक कदम यांची संवादात्मक मुलाखत घेतली. “सामाजिक ज्ञान आणि भान जपणे हेच खरे राष्ट्रसेवेचे लक्षण आहे”, “Beyound yourself… Before yourself…”, “देशासाठी कार्य करणारे सैनिक कधीच उठाव किंवा मागण्या करत नाहीत — ते फक्त आपले कर्तव्य पार पाडतात” अशा विचारांनी सुमेधा चिथडे यांनी रसिकांना विचारमंथन करायला भाग पाडले.

अधिक कदम

गेल्या दोन दशकांपासून पूर्ण मुस्लिम व दहशतवादग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अधिक कदम यांनी सांगितले की, “काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम यांचा DNA एकच आहे. फरक फक्त धर्माचा आहे, पण माणुसकी तीच आहे.” त्यांनी काश्मिरीयत आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यामधील साम्यही अधोरेखित केले.

“माझ्यावर कधीच इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव आला नाही,” असे ते म्हणाले. दहशतवाद्यांनी एकूण 19 वेळा त्यांना उचलून नेले, तरीही त्यांनी मानवतेचा मार्ग सोडला नाही. अनेक काश्मिरी मुलींचे शिक्षण पूर्ण करून देणे आणि विवाहाची जबाबदारी उचलणे हे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे.

त्यांच्या संघर्षमय प्रवासातील या अनुभवांनी उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. “प्रिसिजन गप्पा”च्या या संवादातून सहिष्णुता, शिक्षण आणि मानवतेचा प्रभावी संदेश पोहोचला.

कार्यक्रमाच्या शेवटी विलास कुलकर्णी यांचे अभंग सादरीकरण झाले.अधिक कदम हे उत्तम पखवाजवादक असल्याने विलास कुलकर्णी यांच्या अभंगाला अधिक कदम यांनी पखवाजाची साथसंगत केली.

सामाजिक जबाबदारीची नवी व्याख्या मांडत, सेवाभावी व्यक्तींना सन्मानित करून “प्रिसिजन गप्पा 2025” या वर्षाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला.

प्रिसिजन सेवा सन्मानाचे मानकरी

1. ऋचा पाठक – वृत्तपत्र विक्रेत्या. सोलापूर

2. अंबिका पानगंटी- पहिल्या महिला रिक्षाचालक व प्रशिक्षक. सोलापूर

3. मोहन तलकोक्कुल – मनोरूग्ण आणि बेघरांसाठी कार्य. सोलापूर

4. रामचंद्र वाघमारे – व्यसनमुक्तीसाठी कार्य. सोलापूर

5. राहुल बिराजदार – मासिक पाळी संबंधात प्रबोधन. सोलापूर

6. अतुल गवळी – महापुरात ४० जणांचा जीव वाचवला. सीना दारफळ, माढा.

7. विजयसिंह उबाळे – महापुरात ४० जणांचा जीव वाचवला. सीना दारफळ, माढा.

8. कैलास काटकर – सलूनमध्ये वाचनालय सुरू करून वाचन चळवळीला प्रोत्साहन. मोडनिंब, माढा.

9. राजू डोलारे – कोरोना काळात ३८०० अंत्यविधी. चित्रकार. सोलापूर.

10. संजय बैरागी – स्वतः अंध असून अंधांसाठी विविध कार्य. कुर्डुवाडी, माढा.

Previous Post

अपूर्वाई”ने सजली प्रिसिजन गप्पांची संध्याकाळ!

Next Post

सोलापूर वि‌द्यापीठात आता एआय शिकण्याची संधी

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
सोलापूर वि‌द्यापीठात आता एआय शिकण्याची संधी

सोलापूर वि‌द्यापीठात आता एआय शिकण्याची संधी

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026