सोलापूर : हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

0
43

सोलापूर : तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा जिवलग मित्रांचा पाण्यात उडून अंत झाला. खोल पाण्यात बुडताना दोघा मित्रांनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी दोघा मित्रांनी एकमेकांना मिठी मारत अखेरचा श्वास घेतला तब्बल 24 तासानंतर दोघांचा मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळला नागेश रमेश बोललु वय 26 आणि राज सुरेश गवळी व 21 राहणार संगमनगर मुळेगाव रोड विडी घरकुल अशी मयत झालेल्या मित्रांची नावे आहेत. दोघेही अविवाहित असून त्यांच्या आई-वडील, बहीण असा परिवार आहे.