• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2026
in इतर घडामोडी
0
दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!
0
SHARES
1
VIEWS

‘सरसकट मदत द्या, पंचनाम्यांची फार्स कशाला?’; कर्जमाफीच्या लाभातूनही सरकारवर घणाघाती टीका

मोठा गाजावाजा करून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केवळ ६ टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करत, दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांच्या हातात थेट मदत पडत नसल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे फडणवीस सरकारच्या दुष्काळी शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांना सरसकट मदत, कर्जमाफी, पीकविमा आणि चारा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.भाळवणी येथे फडणवीस सरकारच्या दुष्काळी शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते.

कर्जमाफीचा लाभ फक्त ६ टक्के शेतकऱ्यांना

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “सरकारने मोठा गाजावाजा करून कर्जमाफी योजना जाहीर केली; मात्र सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारी मानसिकतेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची नसून उद्योगपतींना कर्जमाफी देण्याची आहे,” असा आरोप त्यांनी केला.

सरसकट मदत, तात्काळ टँकर, १००% पीकविमा

यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. “दुष्काळ जाहीर केल्यानंतरही पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची आवश्यकता कशासाठी? शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर सरसकट मदत जाहीर करा. पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव मागण्याऐवजी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तात्काळ टँकर मंजूर करा. पीक नुकसानीची १०० टक्के नोंद करून पीकविम्याची रक्कम मिळाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

चारा छावण्यांऐवजी चारा डेपोची मागणी

दुष्काळाच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने चारा छावण्यांपेक्षा चारा डेपो सुरू करण्याची गरज असल्याचेही खासदार शिंदे यांनी सांगितले. “चारा छावण्या सुरू केल्या तर गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना थेट चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘फसवा जीआर’ असल्याचा काँग्रेसचा आरोप

भाषणादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत “फडणवीस सरकारचा हा जीआर फसवा आहे,” अशी टीका केली.

शेतकऱ्यांच्या मागण्या

सरसकट कर्जमाफी द्या

दुष्काळ जाहीर केल्यानंतर तात्काळ टँकर मंजूर करा

१००% पीकविमा रक्कम द्या

चारा डेपो सुरू करा

पाण्याचा प्रश्न सोडवा

प्रशांत साळे यांची भूमिका

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी तालुक्यातील शेती, पाणी आणि शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने आंदोलने करण्यात आली असून, खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून हे प्रश्न शासन दरबारी मांडले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘कोरड्या दुष्काळाचा जीआरही

यावेळी काँग्रेसचे राज्यसचिव ॲड. रविकिरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, विष्णू चोगुले, पांडुरंग चोगुले, सरपंच लक्ष्मण गायकवाड, मच्छिंद्र पाटील, किशोर भंडगे, रावसाहेब बेंडगे, विठ्ठल लोंढे, विठ्ठल लोंढे, निसार तांबोळी, शहाजान पटेल, नवनाथ ढगे, विनायक माळी, संदीप पवार, तानाजी आवळेकर, गंगादेव शिंदे, ज्ञानेश्वर सोडिकर, धनाजी चव्हाण, शिवाजी गाडेकर, यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत, सरसकट कर्जमाफी, पीकविम्याचा लाभ, पाण्याची पूर्तता आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Next Post

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Related Posts

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न
इतर घडामोडी

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा
इतर घडामोडी

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

September 29, 2026
कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात
इतर घडामोडी

कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात

September 29, 2026
हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा
इतर घडामोडी

हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

September 29, 2026
Next Post
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026