महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उजनी धरणावर एक लाख 65 हजार कोटी रुपये खर्चून आधुनिक ए आय डेटा सेंटर तसेच सोलर पार्क उभारले जाणार आहे. जेडब्ल्यू ग्लोबल या कंपनीसोबत झालेल्या 16 एप्रिल 2020 च्या करारामध्ये उजनी धरण परिसरात ग्रीन हायड्रोजन तयार करणे तसेच स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणजे अणुप्रकल्प उभारण्याबाबत मंजुरी देण्यात आली होती. याबाबत नागरिकांच्या मनात भीती देखील निर्माण झाली होती अखेर शासनाने या सामंजस करारात दुरुस्ती केली असून या ठिकाणी सामंजस्य करारात नमूद असलेला ग्रीन हायड्रोजन आणि अणु प्रकल्प प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी देखील याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. उजनी धरणावर सोलर पार्क, ए आय डेटा सेंटर, आणि वीज बॅटरी स्टोरेज या तीन प्रकल्पाशिवाय काहीही होणार नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. यासाठी शेतकऱ्यांची कुठलीही खाजगी जमीन घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय पाण्याचा वापर वर्षासाठी अर्धा टीएमसी पेक्षा देखील कमी होईल याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.










