• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2021
in इतर घडामोडी
0
अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

सोलापूर, दि.28- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य 15 फूट उंचीचा ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

        शुक्रवारी नियोजन भवन येथे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. या बैठकीस कार्याध्यक्षा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच सदस्य नगरसेवक चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब बंडगर, अशोक पाटील, गेना दोलतोडे, आदित्य फत्तेपुरकर, अस्मिता गायकवाड, सारिका पिसे आदी उपस्थित होते. समितीचे सदस्य आमदार रोहित पवार हे ऑनलाइन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वागत केले. समन्वयक प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची माहिती दिली.

        उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती गठीत केली असून त्याची पहिलीच बैठक शुक्रवारी पार पडली. विद्यापीठाच्या 480 एकर जागेत उभारत असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य पुतळा व स्मारक उभारण्याचा निर्णय झालेला असून येथे चबुतरावर 15 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते ठरला. प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी ब्रांझमधील अहिल्यादेवींचे शिल्प तयार करण्यासाठी एक कोटी 90 लाख 40 हजार रुपये अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. शिल्पाचे विविध मॉडेल तयार करणार आहेत. त्यानंतर समिती सदस्यांनी शिल्प पाहून निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले. 

        शिल्प उभारण्याचा खर्च विद्यापीठाकडून केला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित लँडस्केप, सुशोभीकरण, चबुतरा निर्मितीसाठी विद्यापीठाचे वास्तुविशारद असलेल्या डिझाईन कंपनी, मुंबईकडून पाच कोटी खर्चाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. सदरील खर्च राज्य शासन करणार असून या निधीसाठी सर्व सदस्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जबाबदारी सोपविली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक सोलापुरात लवकरात लवकर व्हावे आणि यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. आमदार रोहित पवार यांनीही अहिल्यादेवींचे आदर्श कार्य युवा पिढीला समजावे आणि त्यातून त्यांना दिशा मिळावी असे चांगल्या दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु, असे सांगितले.

चांगला आराखडा; लवकर काम पूर्ण करू

        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारकाचा चांगला आराखडा तयार केलेला आहे. भव्य पुतळ्यासाठी विद्यापीठाकडून एक कोटी 90 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत तर लँडस्केप, चबुतरा व सुशोभीकरणासाठी पाच-साडेपाच कोटी रुपये निधी लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करून आवश्यक निधी मिळवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक सोलापुरात उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असे स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Previous Post

म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा

Next Post

टेंभुर्णी अकलूज भागातील वाटसरूंना लुटणारी आरोपींची टोळी जेरबंद

Related Posts

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव
इतर घडामोडी

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
Next Post
टेंभुर्णी अकलूज भागातील वाटसरूंना लुटणारी आरोपींची टोळी जेरबंद

टेंभुर्णी अकलूज भागातील वाटसरूंना लुटणारी आरोपींची टोळी जेरबंद

ताज्या बातम्या

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026