नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. बाबा मस्की, शोभा मस्की दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच, दाम्पत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.