• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात दत्त जयंती भक्तिभावाने संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2023
in इतर घडामोडी
0
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात दत्त जयंती भक्तिभावाने संपन्न
0
SHARES
0
VIEWS

पाळणा कार्यक्रमाने भाविकांच्या भक्ती आनंदाला उधाण

अक्कलकोट :- अक्कलकोट निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली.

त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेली स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली. यामध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे, इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली होती.

पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत दिवसभरात हजारो स्वामीभक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. आज दिवसभरात श्री दत्त जयंती निमीत्त मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे, ठाण्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर धोटे मॅडम, सोलापूरचे लेखापाल संजय मर्दा, औरंगाबादचे विधिज्ञ अतुलचंद्र वर्मा, सुरतचे सुप्रसिद्ध व्यापारी हिराबेन कांकरिया, अहमदनगरचे सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, कोल्हापूरचे निस्सीम स्वामी भक्त सुहास पाटील आदींसह विविध मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

आज दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्तजन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या अधिपत्त्या खाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पाळणा पूजन व चेअरमन महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, विजय दास, प्रदीप झपके, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, मोहन जाधव, जयप्रकाश तोळणूरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, प्रदीप हिंडोळे, महादेव तेली, स्वामीनाथ लोणारी, नरेंद्र शिर्के, सचिन हन्नूरे, संजय पवार, दीपक गवळी, सागर दळवी, लखन सुरवसे, रमेश होमकर, सचिन पेठकर, चंद्रकांत गवंडी, नरसप्पा मस्कले, रामचंद्र समाणे आदी उपस्थित होते.

Tags: Datta jayantiSri Vatvriksha Swami Maharaj Temple
Previous Post

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती निमित्त स्वामींना ५६ भोगांची नैवेद्य मेजवानी

Next Post

शिर्डीला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू तर 6 गंभीर जखमी

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
शिर्डीला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू तर 6 गंभीर जखमी

शिर्डीला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू तर 6 गंभीर जखमी

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026