सोलापूर : जमावबंदी आदेश मोडल्यामुळे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, अनिल वासन ,अनिल नामा, दाऊद बाबूलाल शेख आदी सत्तर ते ऐंशी कार्यकर्त्यांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विडी कामगारांना ‘वर्क फ्रॉम होम’ काम द्यावे या प्रमुख मागणीसाठी भारतीय ट्रेड युनियन च्या सोलापूर जिल्हा शाखेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते. बिडी कामगारांच्या शिष्टमंडळास धरणे आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेली असतानादेखील आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक वाडीकर तपास करीत आहेत
