सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात २० जन रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ११३ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याने ४४ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ३० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत ६९ व्यक्तींना ई चलनाद्वारे १८ हजार दंड करण्यात आला.