सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आता पक्षातील अंतर्गत सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे हटाव मोहीम सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी महापौर विश्वनाथ चाकोते यांनी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यामुळेच काँग्रेस संपली असून त्यांनी पराभवाची नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन केली. सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे एवढेच नव्हे तर चेतन नरोटे हे विरोधी पक्षाला मॅनेज झाले होते असा आरोप माजी महापौर आरिफ शेख यांनी केला. यावर चेतन नरोटे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली असून चाकोते यांचे पक्षासाठी योगदान काय असा सवाल केला आहे. मी नाही तर तुम्ही मॅनेज झाला आहात असं म्हणत वरिष्ठांनी सांगू दे मी दोन मिनिटात राजीनामा देतो असे चॅलेंज चेतन नरोटे यांनी दिले आहे

