No Result
View All Result
- योग्य वेळी मी माझी भुमिका स्पष्ट करेन .’ असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. ‘माझ्या वडिलांनी 15 वर्ष जनतेची सेवा केली. यापुढे मी देखील सेवा करणार आहे. मलाही आपण एक संधी द्यावी.’ असे देखील सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.
- त्याचबरोबर पुढे बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम माझे वडिल डॉ. सुधीर तांबे यांनी केले. वडिलांच्या कामामुळे मतदार संघातील माणसं पक्ष सोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेत. त्यांनी केलेलं काम पुढे घेऊन जाण्यासाठीच मी यावेळी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.
- सत्यजित तांबे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे याना अधिकृत उमेदवारी जाहीर करून व एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली व मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. तांबे यांच्या या भूमिकेमुळं काँग्रेस पक्षात संताप असल्याचं दिसून येतंय.
- डॉ. सुधीर तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबीत करण्यात आलं. त्यानंतर आता सत्यजित तांबे यांच्यावरही पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
No Result
View All Result