येस न्युज मराठी नेटवर्क ; आज संपूर्ण भारतात देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणार आहेत आणि राष्ट्राला संबोधित करतील. आज देश स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्यदिनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ सुरू केला होता, जो १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनी देशवासियांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
“आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.