विवाहितेची पती, सासूसह ५ जणांविरुद्ध तक्रार

0
246

येस न्युज मराठी नेटवर्क : भवानी पेठेतील मराठा वस्ती येथे राहणाऱ्या समीक्षा चेतन जोशी या विवाहितेने पती चेतन जोशी आणि सासू मंदार जोशी व इतर ५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे . यामध्ये भटजी चाही समावेश आहे.मुलीस दूध पाजू न देणे, सातत्याने धार्मिक विधी व पूजा पाठ करायला लावणे , तसेच दमदाटी , शिवीगाळ केल्याची तक्रार समीक्षा हिने केली आहे. विवाह झाल्यापासून एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचे समीक्षा हिने तक्रारीत म्हटले आहे. भारतीय दंड विधान कलम 498, 323, 504 ,506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.